First

माळी जगत डॉट कॉम हे संकेत स्थळ २१ जुलै २०१२ पासून सुरू असून संपुर्ण महाराष्ट्रातील माळी समाज या वेबसाईटचा वधू वर संशोधनासाठी उपयोग करत आहेत. इंटरनेटच्या माध्यमामुळे घरबसल्या वधू वर उमेदवारांची सर्व माहीती मोबाईल, कॉम्युटर व लॅपटॉपवर सहजपणे उपलब्ध होते. यामुळे समाजबांधवांचा वेळ व पैसा वाचतो.

''प्रत्येकाचे आयुष्य हे समाजावर आवलंबून आहे. तसेच देशाचे भवितव्य हे समाजातील संस्कांरांवर व एकजुटीवर अवलंबून असते. त्यासाठी समाजात एकजूट असणे आवश्यक आहे मात्र इतर कोणत्याही समाजाशी तुलना किंवा भेदभाव न करता इतर समाजाचा आपण नेहेमी आदरच केला पाहीजे तसेच समाजाची प्रगती हवी असेल तर अगोदर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. आपण आपल्यापासून सुरवात केली व आपण आपला समाज एकजूट केला व असे अनेक समाज एकजूट झाले तर निश्चितच देश बळकट होण्यास वेळ लागणार नाही. छ. शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत शिरोमणी सावता महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छ.शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांनी केवळ एका समाजाचा विचार करून कोणतेही कार्य केलेले नाही तर त्यांनी समाजातील सर्व प्रकारच्या घटकांसाठी शैक्षणिक व सामाजिक बदलासाठी अहोरात्र कार्य केलेले आहे. समाज परिवर्तन केवळ समुदायातील सहविचारांमधील देवाणघेवाणीतूनच शक्य आहे. माळीजगत डॉट कॉम (www.malijagat.com) हा एक विचार आहे, समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडण्याचा खटाटोप आहे, आमच्या छोटया छोटया उद्देशातून समाजिक एकोपा वाढीस लागो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.

श्री. मुकुंद किसनराव पेहेरे

संस्थापक संचालक माळी जगत डॉट कॉम www.malijagat.com
संस्थापक संचालक मानसी इन्फोटेक बीपीओ सर्व्हिसेस www.manasiinfotechbpo.com
 • माळी समाजातील सर्व उपजाती मधील उपवर वधू वर प्रोफाईल उपलब्‍ध
 • घरबसल्‍या आपल्‍या स्‍मार्ट फोनवर, कॉम्‍प्‍युटरवर, लॅपटॉप वर वधू वर पोफाईल उपलब्‍ध तसेच अॅप डाउनलोड करण्‍याची गरज नाही
 • नविन प्रोफाईल अपडेट व्‍हॉटसअप वरून कळवले जातात. 
 • संपूर्ण पणे ऑनलाईन असल्‍याने कागदी बायोडाटा व फोटो यांंचा व वेळेचा अपव्‍यय वाचतो व पर्यावरणाचा समतोल साधतो
 • ऑनलाईन व्हिडीओ कॉन्‍फरन्‍स मुळे कोणत्‍याही मेळाव्‍यात सहभागी होण्‍यासाठीचा वेळ व पैसा वाचतो.
 • अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे माहीतीच्या सुरक्षिततेची संपुर्ण हमी माळी जगत डॉट कॉम घेते.   
 • नविन उमेदवारांना ऑनलाईन पध्‍दतीने फॉर्म भरून नोंदणी करण्‍यात येते 
 • माळी जगत नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या माहि‍तीची सत्यता (आधार कार्ड नुसार) पडताळून पाहि‍ल्या नंतरच सदर माहीती वेबसाईटवर प्रसिध्द केली जाते.
 • नोंदणी केल्‍या नंतर जर आपणास इतर उमेदवारची संंपूर्ण माहीती (संपर्क माहीती सोडून) पहावयाची असल्‍यास प्रिमिअम मेंबरशीप असणे आवश्‍यक आहे.
 • प्रिमिअम मेंबर हा लॉगीन करून इतर उमेदवाराची माहीती पाहू शकतो. फक्‍त संपर्क माहीतीसाठी आमच्‍या कडे व्‍हाटसअप वर मागणी करावी लागते
 • नवि‍न उमेदवार नोंदणीची माहीती, प्रत्‍येक महीन्‍याचेे सर्व प्रोफाईल वधू, वर, शिक्षण यानुसार वर्गीकरण करून त्‍याची उमेदवारांच्‍या व्‍हॉटसअप नंबर वर पाठवले जाईल.     
 • सर्वसामान्यांंना परवडेल अशा अत्यल्प फी मधे प्रिमिअम मेेंबरशीप उपलब्ध
 • नविन तंत्रज्ञानाचा वापर करून हे संकेत स्थळ विकसित केलेले असल्यामुळे कोणत्याही मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर वर सहज पणे हाताळण्यास सुलभ.
 • प्रिमिअम सदस्यत्व फी भरण्यासाठी नेट बँकींग, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड द्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध