माळीजगत वधू वर सूचक नियम व अटी
वधू वर नोंदणी फॉर्म भरणे बाबत
१) उमेदवरास मोफत नोंदणी करावयाची असल्यास ऑनलाईच फॉर्म भरणे आवश्यक आहे.
२) उमेदवारांनी माहीती सर्व इंग्रजी मध्ये भरली तरी चालेल
३) ज्या उमेदवारांना ऑनलाईन फाॅर्म भरण्यास अडचण असेल त्यांनी आपली माहीती वेबसाईटवर व्हॉटसअप बटन वर क्लिक करून पाठवावी अथवा 8087206814 या क्रमांकावर व्हॉटसअपवर फोटोसह आधार कार्ड पाठवावे. सदर व्हाटसअप नोंदणी साठी रू.१,१००/- प्रिमिअम मेंबरशीप भरणे आवश्यक आहे.
४) नविन फोटो अपलोड केल्यानंतर व्हॉटसअप वर किंवा फोन वर कळणे कारण फोटो एडीट माळीजगत मार्फत केले जाते.
वधू वर माहीतीबाबत
१) माळीजगत डॉट काॅॅॅम वर वधू / वरांनी भरलेल्या माहीती नुसार प्रोफाईल वेबसाईटवर प्रसिध्द केला जातो. या साठी आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन, पॅनकार्ड यापैकी एक ओळखपत्र देणेे बंधन कारक आहे. तसेच या व्यतिरीक्त माहीतीच्या सत्यते साठी माळीजगत डॉट कॉम कोणतेही पुरावे तपासत नाही. त्यामुळे माहीतीची सत्यतेची जबाबदारी वधू किवा वर यांची राहील याची नोंद घ्यावी.
२) उपलब्ध वधु वराच्या माहीतीमधे सुरक्षिततेच्या कारणास्तव संपर्क क्रमांक व पत्ता दर्शविलेेेेला नसतो. तरी वधू किंवा वराच्या संपर्क माहीतीसाठी प्रोफाईलचे नाव व माळीजगत क्रमांक व्हॉटसअप द्वारे कळवल्यानंतर सदर माहीती कळवली जाते.
३) माळीजगत डॉट कॉम वधू वर लग्न जमवण्यासाठी कोणत्याही प्रकारची मध्यस्थी करत नाही. कृपया याची नोंद घ्या
४) सर्व उमेदवारांची माहीती ही फक्त माळीजगत डॉट कॉम या वेबसाईटवरच उपलब्ध असेल व लॉगीन केल्या शिवाय पूर्ण माहीती पहाता येणार नाही.
५) उमेदवारांनी दिलेल्या सर्व वैयक्तिक व अतिरीक्त माहीतीस ते स्वत: जबाबदर असतील त्याची शहानिशा व जबाबदारी आम्ही घेत नसून सर्वस्वी उमेदवारांची असेल
६) माळीजगत डॉट कॉम वर विवाह जुळल्यास कोणत्याही प्रकारची देणगी दयावी लागत नाही.